Site Overlay

Events

टच संस्थेच्या वतीने १४ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त सामान्य (सदन) घरातील मुले व शिक्षणापासून वंचित मुलांना एकाच व्यासपीठावर आणून सामान्य मुलांच्या मनात गरिब विद्यार्थ्यांबददल आत्मियता, कनव निर्माण व्हावी व शिक्षणापासून वंचित असलेल्या गरीब मुलांच्या मनात आपणही सामान्य मुलांसमवेत स्पर्धा करू शकतो हा भाव जागृत व्हावा व त्यांचा आत्मविश्वास वाढावा याच उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही १४ नोव्हेंबर रोजी बालदिनी क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन पोलीस परेड मैदान नायगाव, दादर या ठिकाणी करण्यात आले होते.

Midas TOUCH
वर्ष 2024-25 “शैक्षणिक साहित्य “ वाटप क्रमांक -१

आज दिनांक १७ जुन, २०२४ रोजी Midas TOUCH Child Educational Sponsorship अंतर्गत या वर्षातील “शैक्षणिक साहित्य “ वाटप, आनंदराव पवार शाळा, वझिरा नाका , बोरीवली (पश्चीम) येथे करण्यात आले.
या वाटपात Mumbai General या गटातील चे १३५ विद्यार्थ्याना साहित्य देण्यात आले.

** TOUCH Congratulation **

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत टच बालग्रामच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..! ✨💐😊❤️

“टच बालग्रामच्या  विद्यार्थ्यांना नेहरू विज्ञान केंद्रास भेट”

TOUCH संस्थेने दि.७ मे रोजी टच बालग्राम मधील विद्यार्थ्यांना नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन पाहण्यास नेले होते.विद्यार्थ्यांना भारताने विज्ञानामध्ये केलेली प्रगती तसेच विज्ञानातून तयार झालेले विविध तंत्रज्ञान, विविध आकाश यानांची माहिती, 3D मध्ये विविध जंगली प्राण्यांची तसेच जलचर प्राण्यांची माहिती, आपली भारतीय संस्कृती, अवजारे, विविध वनौषधी सर्व प्रकल्पांची  प्रत्यक्ष माहिती मिळाली.दुपार सत्रात भोजनाचा नंतर विद्यार्थ्यांनी नेहरू विज्ञान केंद्रामध्ये असलेल्या बगीच्या मधील खेळाचा आनंद घेतला.

TOUCH संस्थेच्या कर्मचारीवृंदाच्या साहाय्याने आयोजित केलेल्या शैक्षणीक सहलिमध्ये बालग्रामची एकूण  40 मुले सहभागी झाले होते.

TOUCH – Shramdan PANI AADVA PANI JAGVA

Please contact

TOUCH

98194 53873 / 87791 62170